|| विद्या विनयेने शोभते ||
डिप्लोमा इन बेसिक रुरल
टेक्नॉलॉजी [डी .बी .आर .टी .]
विज्ञान आश्रम ,पाबळ
विभागाचे नाव :- ऊर्जा व
पर्यावरण
प्रकल्प
प्रकल्पाचे नाव :- सोलर कुलर बनवणे .
विद्यार्थ्याचे नाव :- तेजस अशोक धाडवे .
प्रकल्प सुरु करण्याची दिनांक :- २८/४/२०१७
प्रकल्प पूर्ण करण्याची दिनांक :- ३/६/२०१७
मार्गदर्शक शिक्षक :- श्री.सुयोग वारघडे सर .
अनुक्रमणिका
अनु क्रमांक
|
घटकाचे नाव
|
पृष्ठ क्रमांक
|
१]
|
प्रस्तावना
|
01
|
२]
|
उद्दिठ्ये
|
02
|
३]
|
महत्त्व व गरज
|
03
|
४]
|
प्रकल्पाची निवड :
|
04
|
५]
|
नियोजन
|
05
|
६]
|
अडचणी
|
06
|
७]
|
सर्किट रचना
|
07
|
८]
|
कुलर सेटिंग
|
08
|
९]
|
सोलर कुलरचे फायदे
/तोटे
|
09
|
१०]
|
निरीक्षण
|
१०
|
११]
|
अनुमान
|
११
|
१२]
|
संदर्भ
|
१२
|
१३]
|
अभिप्राय लेखन
|
१३
|
प्रस्तावना
उन्हाळ्याच्या दिवसात कुलरची आवशकता असते .अशा वेळी काही कारणानिमित्त लोड
शेडिंगची समस्या उद्भभवते मंग अशावेळी इलेक्ट्रीक कुलर चालवणे शक्य नसल्याने सोलर
कुलरचा वापर करणे.सोयीचे असल्याने सोलर कुलर हा इलेक्ट्रिक विभागासाठी प्रोजेक्ट
निवडला.
उद्दिष्ट
*हा टेबल सोलर कुलर असल्याने दोन ते तीन माणसांना हवा देऊ शकतो .
*कमी खर्चात हा कुलर बनतो .याची क्षमता दीर्घकाळ टीकु शकते .
*सोलर वर असल्याने याला इलेक्ट्रिक सप्लायची गरज भासत नाही .
*कुलर मधील पाणी सर्कुलेट झाल्याने वाऱ्याच्या वेगावर ते थंड होऊन ती हवा थंड देण्याचे काम करते .
महत्व व गरज
सोलर कुलर मुळे लाइटची बचत होऊन
माणसांची गरज भागवली जाते.त्यामुळे पैशांची बचत होते .या कुलरची साईज छोटी
असल्याने तो कुठेही राहू शकतो .या कुलरमध्ये वापरलेले सोलरपॅनल दीर्घकाळ
टिकवल्याने DC सप्लाय मिळतो .यामध्ये
पूर्ण पात सर्किट असल्याने तो कुलरचा स्पीड कंट्रोल करू शकतो .यामध्ये पाण्याची
बचत केली जाते .या सर्व दृष्टीने सोलर कुलर महत्वाचा व गरजेचा वाटतो
.
प्रकल्पाची निवड :
उन्हाळ्यात गरम होत असते थंड हवेची गरज असते .परंतु पंखा चालवणे हा उपाय असला
तरी लोड शेडींग असल्याने उन्हाळ्यात बहुधा लाईट जास्तवेळ नसते .मंग अशावेळी काम
करायचे म्हणून सूर्याच्या प्रकाशावर उर्जा निर्माण करून त्या उर्जेवर पंखा चालवणे
हा उपाय होऊ शकतो .म्हणून आम्ही सोलर कुलर बनविण्याचे ठरून हा प्रकल्प निवडला
यामुळे उन्हाळ्यात लाईट नसताना देखील थंड हवा मिळू शकते.
नियोजन
ग्राहकाच्या गरजेनुसार सोलर कुलारची निवड केली .त्यासाठी लागणारे सर्किट
डिझायनिंग करून सोलरकुलर मॉडेलची डिझायनिंग केली .डिझायनिंगनुसार साहित्याची लिस्ट
काढून अंदाजपत्रक तयार केले .त्यानुसार साहित्य काढून सर्किट जोडायला सुरवात केली
.त्यानंतर सर्किट मध्ये येणारा करंट voltge चेक करून पूर्ण कुलर
सयंत्रका तयार केली .व त्यानुसार सोलर कुलारची मॉडेल तयार करून पूर्ण सेट फिटिंग
केला .अशा प्रकारे सोलरकुलर तयार केला .
अडचणी
सोलर कुलर करताना सर्किट डिझायनिंग करताना साहित्य जोडताना त्यामधील रजिस्टन्स
voltage
ड्रोप, करंट ,voltage डिव्हायड करताना एकाचा १८ voltage सोलर पॅनल मधून १२voltage व ५ voltage Outputकाढताना कनेक्शन कोणते
द्यायचे हि अडचण निर्माण झाली त्यावर आम्ही पॅनला कनेक्शन देऊन सोलर कुलरचे सर्किट
पूर्ण केले .
सर्किट डिझायनिंग :
सर्किट साठी लागणारे कंम्पोनट व त्यांचा data वाचला त्याची माहिती जाणून घेतली
.व त्यानुसार सर्किट डिझायनिंग केले .
सर्किट साठी लागणारे साहित्य :
रेग्युलेटर ७८१२ , कॅपॅसिटर २५ V , 1000mf, हीट स्क्रीन ,१०K pot इत्यादी ....
सर्किट शोल्ड्रीग :
सर्किट मधील कंम्पोनट डिझायनिंग नुसार O
PCB ला कसे बसावेत .तर या प्रकारे ते बोर्डवर लाऊन सर्किट चेक केले त्यानुसार
त्याचा करंट ,रजिस्टर ,voltage काढला .
करंट : 0.2
रजिस्टर : 0.14
Voltage : 12
नंतर त्या नुसार O PCB बोर्ड वर ते कंम्पोनट शोल्द्रिंग करून त्यावर हिट स्किंग
लावले .जेणे करून रेग्युलेट झाला तो उष्णता पसरवण्यासाठी ,किवा गरम रेग्युलेट थंड
राहण्यासाठी .
सोलर कुलर बनविण्याची कृती :
*प्रथम अंदाज प्रत्रकानुसार साहित्य आणून त्यांची माहिती घेतली .
*डिझायनिंग नुसार साहित्य वेगवेगळे केले .
*सर्किट बनविणे :(१)सर्किट वर डिझायनिंग नुसार कंम्पोनट लावले व शोल्ड्रिंग
गणने शोल्ड्रिंग केली .त्यातून १८ Voltage च्या सोलर पॅनळमधून दोन
सप्लाय घेतले .
१८Voltage सोलर पनल मधून १२Voltage out put व १८Voltage out put out put घेतले अशाप्रकारे सर्किट
वर १२Voltageपवार कमी जास्त करण्याची १० k चा रेगुलेट put शोल्ड्रिंग केला
.रेग्युलेटर गरम होऊ नये म्हणून त्यावर हिट स्किंग लावले .त्यामुळे रेग्युलेटर
मधील उष्णता विभागली जाईल अशाप्रकारे सोलर सर्किट तयार झाले .
सर्किट मधील अडचण :
(१)12V ची Dc पंप जास्त Amper पवार घेते त्यामुळे 12V Dc पंखा कमी Amper घेत असल्याने स्पीड कमी
आहे .
कारण : 12V DC मोटार कमी स्पीड व जास्त Amper chi असल्याने ही अडचण समजते .
(१)12V DC पंखा हा 0.15 Amper cha असल्याने स्पीड कमी देते .
लेजर कटरचा
उपयोग :
सर्किट सुरक्षतेसाठी लेजर कटरवर प्रेस फिटचा
बॉक्स बनवला .त्यामध्ये बटन प्रिन्स ,सॉकेट्स साठी जागा ठेवली .व त्यामध्ये सर्किट
बनवून बॉक्स फीट केला .व हा बॉक्स कुलर मध्ये बसवला .
सोलर कुलरचे
फॅब्रीकेशन :
सोलर कुलरची पूर्ण बॉडी L अॅगलची करून ती मापनाद्वारे व डिझायनिंग द्वारे लोखंडी अॅगलचा साचा
तयार करून घेतला.
सोलर कुल्रचा कुलिंग सेट तयार करूणे :
L अॅगलच्या बॉडीवरून त्यापेक्षा आतील भागावरून
मापन कसे कुलिंग सेटची मापे काढून त्यावर वेल्डमेस जाळी कट करून ती काटकोनात बेंड
केली.त्यावर नाराळाच्या किसी लाऊन हवा आत येईल अशी पारदर्शकता ठेवली व त्यावर
बारीक जाळी लाऊन ती कुलिंग होण्यासाठी ड्रीपर लाईन बसवली व तो पूर्ण सेट लाकडी
पट्टीने फीट केला.अशा प्रकारे कुलिंग सेट तयार झाला .
गुगल स्केचप वर काढलेली आकृती :-
L अॅगलच्या
कुलर बॉडीमध्ये कुलिंग सेट व पंखा सेट करून :
(१)बॉडी सेट करून त्याला
कुलिंग सेट नटबोल्टच्या सह्याने :
(२)त्यामध्ये दोन लोखंडी पट्ट्यांच्या साह्याने मापनामध्ये पंखा नटबोल्टच्या
सह्याने
(३) त्यानंतर साहिटला जाळी लावून कुलर बंद केला .
कुलरमध्ये सर्किट सेट करणे .
*कुलिंग सेटच्या पाईपलाईनला 12 Vची DC पंप सेट केला . त्यानतंर
सर्किट कुलरला बसवून त्याचे 12V DC पंप व 12V DC पंख्याचे कनेक्शन सर्किटला करून त्यातून दोन स्वीच व एक
स्पीड कंट्रोलचे कनेक्शन घेतले.यामुळे सर्किट मध्ये काही अडचण निर्माण झाली .व तो
पलर मध्ये जोडला असल्याने एकस्वीच फक्त पंखा चालवेल .व दुसरा स्वीच मोटार चालू
करेल जेव्हा सूर्यप्रकाश कमी असेल तेव्हा कोणताही एकाच पंखा /पंप चालू राहील हा
फायदा बटनांचा होईल .
स्पीड कंट्रोलने पंख्याचे स्पीड कंट्रोल करता येईल .यामुळे येथे 10 K POT लावला आहे . कुलरच्या वरील भागामधून पाणी ओतण्यासाठी जागा
ठेवली आहे .अशा प्रकारे हा आपण टेबल वर काम करत असून ते आपली थंड हवेची इच्छा
पूर्ण करू शकतो .याला कलर करून कुलर तयार झाला .
सोलर कुलर मध्ये येणाऱ्या अडचणी :
*कुलर मधील हवेचा लोड सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे
*एकाच सोलर पॅनल मधुन दोन कनेक्शन घेतल्याने ते कनेक्शन सूर्यप्रकाश कमी
असल्यावर एकच कोणतेतरी काम करते म्हणून दोन स्वीच लावण्याची गरज पडली
*हा छोटा असला तरी लोखंडी असल्याने वजनाने जड आहे
*सूर्यप्रकाश रात्रीनसल्याने तो रात्री थंड हवा देऊ शकत नाही .
सोलर कुलरचे
फायदे :
*हा कुलर सोलरवर असल्याने तो लाईट नसतानाही थंड हवा देऊ शकतो .
*हा साईजने छोटा आहे म्हणून कोणत्याही ठिकाणी रारू शकतो
.
*याचे मटेरियल जास्त काळ टिकू शकते .
*लाईट बिलची बचत होते .
*सोलर पॅनल असल्याने हा जास्त काळ टिकवून राहू शकतो
*सोलर कुलर साठी प्लाम्झा कटरचा उपयोग:
पूर्ण L अॅगल ची कुलरची बॉडी व तिला
जाळी लावून तिला पूर्ण झाल्यानंतर तिच्या समोरील बाजूला व वरील बाजूला पत्रा
लावण्याचे होते .म्हणून ते मी सॉलीडवर्क वर डिझायनिंग बनवून प्लाझ्माकटरवर कात
केली व तो पत्रा बसवला.
निरीक्षण :
सोलर कुलर हा टेबल वरील काम करण्यासाठी उपयुक्त असला तरी याची साईज ट्रे
प्रमाणे जोडणी केल्यामुळे आकाराने मोठा आहे .
पुर्ण स्ट्रक्चर लोखंडाचे असल्याने ते जड आहे .
कुलर मधील सर्किट सेटिंग करून बसवले व सर्क्युलेट होणारे पाणी जमिनीवर पडू नये
म्हणून ट्रे मधील कुलिंग सेट २ CM आत मध्ये बसविला .हे सर्व शक्य झाल्याने कुलिंग पंखा
चालवल्यावर थंड हवा मिळाली .
अनुमान :
आम्हाला सोलर कुलर हा प्रकल्प करताना इलेक्ट्रिकल बद्दल नवीन गोष्टी शिकण्यास
मिळाल्या .यामधील कुलर बॉडी ,सिम्पल सोलर सर्किट ,12v DC पंप , कसा बसविणे हे शिकलो .कुलर
ची रचना काय असते हे शिकायला मिळाले .सोलर पॅनलचा वापर कसा करायचा ,त्यामध्ये Voltage , अॅम्पिअर ,करंट रजिस्टन्स या गोष्टी शिकण्यास
मिळाल्या .या कुलरचा उपयोग सर्व लोकांना फायदेशीर ठरते असे वाटते .
संदर्भ :
·
विषय शिक्षकांच्या माहिती नुसार पुढील बाबी केल्या .
·
हा प्रकल्प करताना सर्वप्रथम इंटरनेट वर माहिती मिळाली .
·
इलेक्ट्रीकल मार्केट सर्वे करून कम्पोंनट ,इतर साहित्यांची
मार्केटिंग किमत काढली
·
सरांच्या मदतीने कम्पोंनटस बद्दल माहिती घेतली .
·
FAB-LAB चा उपयोग करून सर्किट बनविणे .
अभिप्रायलेखन :
विज्ञान आश्रमामध्ये (DBRT) करताना विभाग ,उर्जा आणि पर्यावरण
यासाठी सोलर कुलर हा प्रकल्प निवडला असता त्यामध्ये चांगल्या प्रकारे पूर्ण
करण्याचा प्रयत्न केला .
हा
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधीत लागला .हा प्रकल्प पूर्ण करताना
आमच्या शिक्षकांनी मोलाची मदत केली. त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत .याचा
उपयोग आम्हाला पुढे नवीन इलेक्ट्रीकल प्रोजेक्ट कसे तयार करावे हे शिकण्यास मिळाले
.व इलेक्ट्रिकल सर्किटबद्दल माहिती मिळाली .
अशा प्रकारे आम्ही हा प्रकल्प पूर्ण केला .
No comments:
Post a Comment