Saturday 4 February 2017

//विद्या विनयेने शोभते //

विज्ञान आश्रम ,पाबळ

डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नोलॉजी { डी.बी.आर.टी.}

सन :-२०१६-२०१७

प्रकल्प

विभाग :- शेती व पशुपालन


प्रकल्पाचे नाव :- धिंगरी अळंबी :लागवड तंत्रज्ञान

विद्यार्थ्याचे नाव :- तेजस अशोक धाडवे.

प्रकल्प सुरु करण्याची दिनांक :- १२/१/२०१७

प्रकल्प समाप्ती दिनांक :-

मार्गदर्शक शिक्षक :- श्री. लोखंडे सर .

प्रेरणास्थान :- श्री. शानबाग सर .



प्रस्तावना :

         अळंबी म्हणजे अग्यारीक्स प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी बुरशी होय .या

 बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळे येतात व या फळांस “अळंबी” किव्हा “भूछत्र” म्हणतात 

.तसेच इंग्रजीत मश्रूम या नवाने ओळखले जाते. अलाम्बीचे निसर्गात अनेक प्रकार आहेत.अनेक
 शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कमी भांडवलात व आहारात उपयुक्त अशी धिंगरी अळंबी उत्पादन 
करतात. या अळंबीस “शिंपला” किवा “पावसाळी छत्री” अशा नावाने सुद्धा ओळखले जाते.
धिंगरी अळंबीच्या जाती व वैशिट्ये :
धिंगरी अळंबीच्या रंग ,रूप ,आकारमान व तापमानाची अनुकुलता यानुसार प्रयोग शाळेत व निवड चाचणीद्वारे विक्षित केलेल्या महाराष्ट्रात प्रचलित असणाऱ्या विविध जाती खालील प्रमाणे आहेत.

१] प्लुरोटस साजर काजू

2] प्लुरोटस इओस

३] प्लुरोटस फ्लोरिडा

इत्यादी जाती आहेत 
.
१] प्लुरोटस साजर काजू :-

 १] या जातीची फळे करड्या रंगाची असतात 
.
  2] तापमान व आद्रता फरकास जास्त लागते 
.
  ३] आवश्यक तापमान २०-३० से.ग्रे.व आद्रता ८० -९०%

  ४] फळे शिंपल्याच्या आकाराची ,आकर्षक व चविष्ट असल्याने चांगली मागणी आहे.


धिंगरी अळंबी लागवडीची सुधारित पद्धत :-

 १]लागवडीसाठी जागेची निवड :- 


                          अळंबीच्या लागवडीसाठी उन ,वारा, पाउस या पासून संवरस्कन होईल असा निवार्याची गरज आहे .पक्के अथवा कच्चे बांधकाम असलेली खोली अथवा शेड ,आच्छादित असलेली झोपडी असावी .या जागेमध्ये त्रीव्र सुर्योर्काश नसावा व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी लागते .
2] लागवडीचे माध्यम :-

                 धिंगरी अळंबीच्या लागवडीसाठी पिष्ठमय पदार्थ अधिक असणारी घटकांची आवशक्यता असते .यासाठी शेतातील पिकांचे अवशेस ,भातपेंडा ,गव्हाचे काड ,ज्वारी ,बाजरी ,मका यांची ताटे व पाने ,कपाशी ,सोयाबीन ,तूर काड्या ,उसाचे पाचट .नारळ व केळी यांची पाने भुईमुगाच्या शेंगाची टरफले ,वाळलेले गवत व पालापाचोळा इत्यादी घटकांचा वापर करता येतो .

३]  लागवडीचे वातावरण :-

                     धिंगरी अळंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान २२ते ३० से.व हवेती आद्रता ६५ ते ९०% असणे आवश्यक असते .यासाटी लागवडीच्या ठिकाणी तापमान व आद्रता यांचे नियंत्रण ठेवनेसाठी जमिनीवर ,हवेत चोहोबाजूंनी गोणपाटाचे आवरण लावून त्यावर स्प्रे पंपाने पाणी फवारण्याची व्यवस्था करावी .सर्वसाधारण २५ से.या तापमानास या अळंबीची उत्तम वाढ होते.

४] लागवडीचे पद्धत :-
                                     काडाचे  २ ते ३ से.मी. लांबीचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरून थंड पाण्यात ६ ते ८ तास बुडून भिजत घालावे .काडाचे पोते थंड पाण्यातून काडून त्यातील जादा पाण्याचा निचरा करावा .
५] काढ निर्जंतुकीकरन :-

                  भिजवलेल्या काडचे पोते 80 से.तपमानाच्या गरम पाण्यात १ तास बुडवावे. काडचे पोते गरम पाण्यातून काडून त्यातील जादा पाणी निथळल्यानंतर तसेच थंड होण्यासाठी तीवईवर ठेवावे .अथवा भिजवलेल्या काडचे पोते 80 से.तपमानाला वाफेवर १ तास ठेवून काढ निर्जंतुकीकरन करावे .काढ ठाण कण्यासाठी पोत्यासह सावलीत ठेवावे .अथवा निर्जंतुकीकरणासाठी
७.५ ग्र्याम बाविस्टीन व १२५ मिली .फोर्मेलीन १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये वाळलेले काढ पोत्यात भरून १६ ते १८ तास भिजत ठेवावे .द्रावणातील काड पोत्यासह बाहेर काडून जादा पाण्याचा निचरा करण्यासाठी ४ते५ तास ठेवावे .नंतर काड ३५ सेमी.*५५ सेमी आकाराच्या ५% फोर्मेलीन ने निर्जंतुक केलेल्या plyasthik पिशवी मध्ये थर पद्धतीने भरावे .५% फोर्मेलीन द्रावण फवारलेल्या बंदिस्त जागेत हे काम करावे .

           काड भरताना प्रथम पिशवीच्या तळाला अळंबीचे थोडेसे बीयाने टाकावे .नंतर ८-१० सेमी.जाडीचा काडाचा थर द्यावा.व त्यावर अळंबीचे थोडेसे बीयाने टाकावे.बियाणाचे प्रमाण काडाच्या वजनाच्या २% असावे .काढ व बिया यांचे ४ते५ थर भरावे .भरताना तळहाताने काढ थोडेसे दाबावे .पिशवी भरल्यानंतर दोर्याने पिशवीचे तोंड बांधावे .पिशवीच्या पृष्ठभागावर सुई /टाचणी च्या सहायाने छिद्रे पाडावीत 
         
                        अळंबीच्या बुर्शीच्या वाढीसाठी भरलेल्या पिशव्या मांडणीवर ठेवाव्यात .त्यासाठी २५-२८ से.तापमान अनुकूल असते .बुरशीची पांढरट वाढ सर्व काडांवर दिसून आल्यावर पिशवी कडून टाकावी . बुर्शीच्या वाढीसाठी १५ते १८ दिवस लागतात .बुरशीच्या धाग्यांनी काढ घट्ट चिटकून त्यास ढेपेचा आकार प्राप्त होतो .त्यास बेड म्हणतात .

६] पिक निगा :-
              योग्य अंतरावर अळंबीचे बेड ठेवावेत .बेडवर दिवसातून 2 ते३ वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी .खोलीमध्ये जमिनीवर ,भिंतींवर पाणी फवारून तापमान व आद्रता योग्य प्रमाणात ठेवावी .३ ते ४ दिवसांत बेडच्या सभोवताली अंकुर दिसू लागतील व पुढील ३ ते ४ दिवसांत त्याची झपाट्याने वाढ होहून फळे काढणीस तयार होतील .

७] खते व पाणी व्यवस्थापन :-

               अळंबी ,तंतुमय वाळलेल्या अवशेषांवर वाढते .पिशवीतून बाहेर काढल्यानंतर धिंगरी वाडीच्या काळात बेडवर दिवसातून 2 ते ३ वेळा पाण्याची फवारणी करावी .पिकाच्या वाडीच्या काळात तापमान २० ते ३० से. व आद्रता ७० ते ९० % ठेवणे गरजेचे आहे .
८] पिकाचे संवरक्षण :-

               अळंबी हे अतिशय नाजूक,नाशिवंत व अल्प मुदतीचे पिक आहे.उग्व्निसती वापरलेले काढ व इतर घटकांचे व्यवस्थित निर्जंतुकीकरण ण झाल्यास तसेच खोलीमधील तापमान व आद्रता यामध्ये मोठा फरक झाल्यास तत्काळ रोग व किडीचा प्रादुरभाव दिसून येतो .त्यामुळे पिकांचे नुकसान होते .धिंगरी अळंबी वरील पुढील रोग दिसून येतात .

अळंबीवरील रोग :-  

१] ग्रीन मोल्ड :-

              हा रोग ट्रायकोडर्मा या बुरशी मुले होतो . अळंबीच्या बुर्शीच्या वाढीसाठी पिशवीत काडावर ट्रायकोडर्मा या बुरशी वाढ होवून काडावर हिरवट काळे डाग पडून काढ कुजते .या काडावर अळंबीच्या बुरशीची वाढ होत नाही .फळे येण्याच्या काळात या रोगचा परिणाम झाल्यावर काळे डाग पडून फळे कुजतात .काडाचे निर्जंतुकीकरण योग्यरित्या ण झाल्यास या रोगचा परिणाम होतो व हवा ,पाणी यांद्वारे याचा प्रसार इतर अनेक पिशव्यामद्ये होवून नुकसान होते .

 उपाय :-

१]अळंबीच्या लागवडीसठी वापरण्यात येणारे काढ  काळजीपूर्वक निर्जंतुक करावे 
.
        2] हाताना निर्जंतुक औषध लावून पिशव्यांची हाताळणी करावी .

        ३] या रोगांचा परिणाम दिसून येताच रोगग्रस्त पिशव्या तत्काळ वेगळ्या करव्यात 
.
        ४] बेडवर 2%तीव्रतेचे फोर्मेलीन फवारणी करावी .


        ५] कार्बेडेझीम ०.१% किवा बेनलेट ०.०५ % द्रावणाची एका आठवड्यात अंतराने फवारणी करावी .
2] विषारी काळ्या छत्र्या :-

                     हा रोग कॉप्रीनस या बुरशीपासून होतो .पिशवीत अळंबीच्या बुरशीची वाढ 
होत असताना कॉप्रीनस या बुरशीची वाढ होते .बेड सोडल्यानंतर अळंबीच्या फळाऐवजी काळ्या
 रंगाच्या असंख्य छत्र्या काडावर दिसून येतात.

उपाय :-
१] अळंबीच्या लागवडीसठी वापरण्यात येणारे काढ  काळजीपूर्वक निर्जंतुक करावे .

       2] बेडवर जास्त पाणी मारू नये 
.
       ३] बेडवर काळ्या छत्र्या दिसताच हाताने कडून टाकाव्यात .

अळंबीवरील किडी :
-
१] शिरीड माशी 
:-हि माशी रंगाने काळ्या रंगाची असून २ ते ३ मी.मी.लांब असते .या माशीची अली मळ कट पानडरी असते .डोक्यावर चकचकीत काळा ठिपका असतो .हि अली अळंबीची बुरशी खाते तसेच फळातील रस शोसून उपजीविका करते त्यामुळे पिकांचे ६०% नुकसान होते 
.
उपाय :-१] अळंबीच्या लागवडीसठी वापरण्यात येणारे काढ  काळजीपूर्वक निर्जंतुक करावे .

        २] माशा आत येऊ नये म्हणून लहान छिद्रे असणारी जाली बांधाव्यात .
         ३] माशांचा परिणाम दिसताच खोल्यांमध्ये मॅलेथिआन /नुवान ०.०१ % या कीटकनाशक फवारावे .
२] फ्लोरिडा माशी :-

हि माशी रंगाने फिकट तपकिरी असून या माशीची पूर्ण वाढलेली अली मळ कट पंडरी व ३ मी.मी लांब असते .हि माशी अळंबीच्या खालच्या भागातील कल्याणवर अंडी घालते .अंड्यातून बाहेर पडलेली अली धिंगरीच्या फळांमधील रस सोसून घेते .त्यामुळे फळांची वाढ व्यवस्तीत न होता मोटे नुकसान होते .
उपाय 
:- १] या माशीचा परिणाम दिसताच डायक्लोरोव्हास १ ली .पाण्यात १ मिली. / मॅलेथिआन १लि .पाण्यात २मिलि फवारणी करावी .
        २] अळंबीच्या लागवडीसठी वापरण्यात येणारे काढ  काळजीपूर्वक निर्जंतुक करावे.
        ३] बेडवर फळे असताना कोणत्याही कीटकनाशकाची अथवा बुरशी नाशकाची फवारणी करू नये .
काढणी :-

         पहिली काढणी पिशवी भरल्यापासून २० ते २५ दिवसांत करावी काढणीपुर्वी १ दिवस अगोदर अळंबीवर पाणी फवारू नये .यामुळे अळंबी कोरडी व तजेलदार रहाते . अळंबीच्या कडा आत वळण्यापूर्वी काढणी करावी लहानमोठी सर्व अळंबी एकाच वेळी कडून घ्यावी .अळंबीच्या देठाला धरून पिरगळून काढणी करावी .दुसरे पिक घेण्यापूर्वी त्याच बेडवर हलका हात फिरवून कुजलेल्या व मोकळ्या झालेल्या काडाचा पातळसा थर अलगद काढावा .दिवसांतून २ ते ३ वेळा नियमिथ पाणी द्यावे .८ ते १० दिवसांनी दुसरे पिक तयार होते .त्यानंतर ८ ते १० दिवसांनी तिसरे पिक मिळते .साधारणपणे ३ किलो ओल्या कडच्या एका बेडपासून 40 ते ५० दिवसात १ किलो ताज्या अळंबीचे उत्पादन मिळते .


यांत्रिकीकरण :-

          वेळ कमी करण्यासाठी च मजुरांवरील खर्च कमी करण्यासाठी तसेच प्रतीदिनी ५०० किलो अळंबीचे उत्पादन घेणाऱ्या मोठ्या युनिट मध्ये “यांत्रिकीकरण” शक्य आहे .यामध्ये काडाचे तुकडे करण्यासाठी चॉपकटर मशीन ,काडचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी बॉयलर वापरणे तसेच काढ पिशवीत भरणे व अळंबीचे स्पॉन काडत मिसळणे यासाठी लागणारी यंत्र सामुग्री बाजारात उपलब्ध आहे .बाजारात धिंगरी अळंबीस मागणी वाढल्यास यांत्रिकीकरनतून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य आहे .

प्रतवारी व पॅकेजिंग :-

१] अळंबी साठवणूक :


- ताजी अळंबी पालेभाजीप्रमाने अल्प काळात टिकणारी व नाशवंत आहे .काढणी नंतर काडीकचरा बाजूला काडून साफ अळंबी छिद्रे पाडलेल्या plyastik पिशवीत दोन दिवस टाकून रहाते .फ्रीजमध्ये ३ ते ४ दिवस टिकते . ताजी अळंबी बाजारपेठ नसल्यास अळंबी उनामध्ये वळवावी .अळंबी उनामध्ये २ ते ३ दिवसात पूर्णपणे वाळते. वाळलेली अळंबी plyastik पिशवीत सील करून हवाबंद ठेवल्यास ती ६ महिन्यापेक्षा अधिक काल चांगल्या स्थितीत राहते .

वाळलेल्या अळंबीचे वजन ओल्या अळंबीच्या वजनाच्या १/१० इतके कमी होते . 

     
२]अळंबी मूल्यवर्धन :-

              अळंबीमध्ये प्रथिने ,व जीवनसत्त्वे खनिज पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात  त्यामुळे अळंबी पूरक अन्न म्हणून वापरले जाते .ताजी अळंबी किंव्हा वाळलेली अळंबी विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून अनेक पदार्थ तयार करून विकले तर शेतकऱ्यांस अधिक फायदा होतो .

३]अळंबीपासुन मूल्यवर्धित पदार्थ :
-
               वाळलेल्या अळंबीची पावडर तयार करून त्यापासून सुप तयार करता येते .
तसेच पावडरचे लहान प्याकिंग करून विक्री करता येते . वाळलेल्या अळंबीची पावडर तयार करून त्यापासून गोळ्या किंव्हा वड्या तयार करता येतात . अळंबीची पावडर तयार करून त्यापासून पापड करता येतात .तसेच अळंबीचे लोणचे ,शेवया ,सांडगे ,चिप्स बनवतात .अळंबी पासुन तत्काळ खाण्यालायक अनेक पदार्थ व पाककृती करता येते .अशा प्रकारे अळंबीची भाजी ,पुलाव ,भजी ,समोसा ,वडे ,स्यालेड, कबाब,आम्लेट ,करी ,सॉस ,पिझ्झा अशे अनेक पदार्थ बनविता येतात .


४] काही मुलभूत बाबींची माहिती असणे गरजेचे आहे :-


१] अळंबी हि वनस्पती कुळातील असून पूर्णतः शाकाहारी आहे .२] अळंबीच्या  मुलाव्यतिरिक्त सर्व भाग खाण्यास योग्य अहेत .३] बाजारात विक्रीस ठेवलेली अळंबी हि खाण्यायोग्य असतात .काही जंगली अळंबी विषारी असतात .तेव्हा त्याबाबत ज्ञान असणे आवश्यक आहे .अळंबीची भजी करताना जास्त वेळ शिजवू नये .५]अळंबी १० ते १५ मिनिटात शिजते .६] अळंबी पाण्यात जास्त वेळ धुवू नये .त्यामुळे त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात                             अळंबीचे महत्व जनजागृती करून पटवून दिल्यास या पिकास भविष्यात निचित मागणी वाढणार आहे .



विज्ञान आश्रम

धिंगरी अळंबी प्रकल्प

सन :-२०१६-१७


१]  धिंगरी अळंबी प्रकल्प करण्यासाठी जागेची निवड :-

              धिंगरी अळंबी प्रकल्प करण्यासाठी जागेची निवड डोम मध्ये केली .कारण तेथे लागणारी आद्रता व तापमान समान राखता येते .


२] ]  धिंगरी अळंबी प्रकल्प करण्यासाठी वापरलेले रसायन [लिक्विड ] प्रमाणासह 



:                  १] काडाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी :-


                                  १] पाणी :- २२० मिली .

                                   २] फोर्मेलीन :-२२५ मिली .

                                   ३]बाविस्टीन :- १५ ग्र्याम .

२] डोम निर्जंतुकीकरण करण्यासाठी :-  
१] पाणी :- ५ लिटर .  
            
                                   २] फोर्मेलीन :- ८ मिली 
.
                            ३] बाविस्टीन :- ३ ग्र्याम 

.

३] बेड भरण्यासाठी वापरलेले साहित्य निर्जंतुकीकरण करण्यासाठी :-

                                   १] पाणी :- २ लिटर .            
  
                                   २] फोर्मेलीन :- ५  मिली .

                                   ३] बाविस्टीन :- २ ग्र्याम .


४] वापरलेले स्पॉनचे वजन :- १ किलो .




बेड क्रमांक .
1[BK]
[BK]
[ JK ]
[JP ]
[ JP ]
[UV ]
[BB]
[G]
[XX] 
१०[XX]
बेडचे वजन
2.873
2.920
4.780
2.120
3.002
3.350
4.854
2.246
5.503
2.612
पिशवी वजन
13gm
13gm
13gm
13gm
13gm
13gm
13gm
13gm
13gm
13gm
भुसा /काड
2.760
2.197
4.667
1.987
2.889
3.237
4.741
2.133
5.390
2.499
स्पॉनचे वजन
100gm
100gm
100gm
100gm
100gm
100gm
100gm
100
gm
100
gm
100gm
५०% उत्पादन
359
gm
560
gm
296
gm
378
gm
156
gm
215
gm
479
gm
220
gm
216
gm
296
gm

No comments:

Post a Comment